सोबती
सोबती
वाटेत असणारे नसणारे सोबती
विविध रंगांच्या छटा दाखविती
कधी त्यातल्या भडक असतात
कधी काहीशा फिकट होतात
काही काळाच्या ओघात वाहतात
काही पडद्याआड लपल्या जातात
काही छटा जशा चांदण्या
त्यात असतात त्यांच्या वाटण्या
काही अनामिक रंग तयार
काही जणांना पडले भुयार
काही काही जातात फसवून
भास आभास हसतात दुरून
