Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sangita Pawar

Inspirational

4.5  

Sangita Pawar

Inspirational

संविधान दिन

संविधान दिन

1 min
527

भारतीय थोर विचारवंतांनी

केला अभ्यास राज्यघटनेचा

२६ नोव्हेंबर १९४९ दिवशी

स्वीकार केला संविधानाचा ||

२६ जानेवारी १९५० पासूनी

लोकशाहीचा केला विचार

अथक प्रयत्नातून आंबेडकर

बनले राज्यघटनेचे शिल्पकार ||

स्वातंत्र्य ,समता ,,बंधुता

करूया सर्व मूल्यांचे जतन

विश्वबंधुत्वाचा मिळे संदेश

संविधान भारताची शान ||

संविधानाचा करुनी अंमल

अर्थ आला राज्यव्यवस्थेला

शांतीची शिकवण घेऊनी

सदा स्मरावे संविधानाला ||

दिशा मिळाली देशकारभाराला 

कायदा ,व्यवस्था संविधानात

आम्ही भारतीय नागरिक बोले

"सत्यमेव जयते"घोषवाक्यात ||

नांदोत सारे सर्वधर्म एकत्र 

करू संविधानाचा सन्मान

 लोकशाहीयुक्त देशातील

 संविधानाचा असे अभिमान ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational