संततधार
संततधार
टिप टिप पाऊस पडे पाऊस टिप टिप
फड फडे पंख पाखरू घरटी चिडीचूप
लगबग चाहुल करे जीवाची तगमग
हर रूप आगळे भुरळे मन खूप खूप
टप टप निथळे जंगल रानकिड्यांची किर किर
चिखलपाणी उतारावर वाहे कुठे जमिन धूप
झर झर झरती झरे कडे कपारीत दूर दूर
रिप रिप सरी पावसाने अवघे बदलले रूप
