Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Shobha Wagle

Inspirational


4.8  

Shobha Wagle

Inspirational


संत वाणी अभंग

संत वाणी अभंग

1 min 351 1 min 351

ज्ञानाचे अमृत ।

पाजिले संतानी ।

घेतले लोकांनी । 

उपदेश ।।१ ।।


ज्ञान उपदेश ।

अज्ञानी लोकांस ।

सकल जनास ।

कल्याणास ।। २ ।।


ज्ञानोबा तुकोबा । 

वाङ्मय महान ।

करण्या सुजाण । 

लोक हिता ।।३ ।।


भुतदया दावी । 

संत एकनाथ ।

एकता मनात । 

बाप श्राध्दा ।। ४ ।।


सावंता माळीने । 

पाहिला मळ्यात ।

बागेच्या रुपात ।

विठ्ठलाला ।। ५ ।।


बहिणा बाईच्या । 

ओव्याने शिकलो ।

श्रेष्ठत्व जाणलो । 

सामान्य स्त्री ।। ६ ।।


संतांची ती वाणी । 

ज्ञानाचे भांडार ।

शिक्षण साकार ।

संस्कृतीचे ।। ७ ।।


संतांच्या कार्याची । 

महती जाणावी ।

जतन करावी ।

आत्मसात ।।८ ।।


Rate this content
Log in

More marathi poem from Shobha Wagle

Similar marathi poem from Inspirational