संत मीराबाई
संत मीराबाई
मोठ्या घरी नांदे/ मीरा हरिभक्त
मनी तिच्या फक्त / हरिनाम
हरिमय भक्ती/ मुरारीची पूजा
मनी भाव दूजा/ कधी नसे
मीरा झाली दंग/ हरिभजनात
जहर दूधात/ कालवले
प्राशन तयाचे/ भाबड्या मीरेने
भक्तीभावनेने/ श्रद्धामृत
भोळा भक्तीभाव/ दाटे अंतरात
सदा चिंतनात/ श्रीकृष्णाच्या
उच्चकोटी भक्ती/ कृष्ण अद्वैतात
पूजन मनात/ भक्तिभावे
वेडी हरिभक्ती/कुणाला कळेना
जनसामान्यांना/ वेडी मीरा
ईश्वरा कळली/ भाबड्या मीरेची
आस दर्शनाची/ मनोमनी
दर्शन देऊनी/ पावन मीरेला
जन्म सार्थकाला/ लावियला