संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर
इंद्रायणी काठी /कुलकर्णी वंशी
तेजःपुंज ऋषी /ज्ञानराजा (१)
आधार नसता /आई वडीलांचा
तेजाळला सूर्य /ज्ञानदेव (२)
मांडे भाजण्यासी /पाठीसी अंथरे
भिती ना बिथरे /सोसे झळा (३)
भिंत चालविली /गर्वहरणासी
वाटे आश्चर्यासी /चांगदेवा (४)
दान देवाजीचे /ग्रंथ ज्ञानेश्वरी
प्रतिभा ईश्वरी /ज्ञानियांची (५)
भाषा अविष्कारे /मराठी माऊली
प्रसन्न जाहली /ज्ञानदेवा (६)
विठ्ठल चिंतनी /समाधी साधन
लोटताती जन /दर्शनासी (७)
