संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर
ज्ञानीयांचा राजा |आमुची माऊली
कृपेची सावली | ज्ञानदेव १
अमृतानुभव |आहे ग्रंथ थोर
समजाया फार |अवघड २
अज्ञ जनासाठी |गीता मराठीत
सुलभ बहुत | समजण्या ३
हरिपाठ नेम |वारकरी धर्म
तेच आहे मर्म | साधनेचे ४
जरी त्रास दिला |टाकले वाळीत
नसे अंतरंगात | खेद काही ५
जठराग्नी करी |दिप्त सहजची
इच्छा मुक्ताईची |पुर्ण करी ६
चांगदेव आला |शरण तुम्हासी
आला चरणासी |मुक्ताईच्या ७
माऊली ती धन्य |जगाचे कल्याण
झिजे कण कण | जगासाठी ८
अगाध महिमा |शब्दातीत आहे
वाचा मौन राहे |दास म्हणे ९
