संत ज्ञानेश्वर महाराज
संत ज्ञानेश्वर महाराज
रुक्मिणीबाई व विठ्ठलपंत
यांच्या पोटी जन्म घेऊन
आपेगावी प्रकटले संत
ज्ञानेश्वर नाव महान ||१||
आळंदीस इंद्रायणी तीरी
अजानवृक्षाच्या सावलीत
समाधिस्थान केले सिद्ध
ज्ञानदेव बैसले समाधीत ||२||
सगळ्यांना घेऊनी सामावून
वारकरी संप्रदायाचा रूपात
ज्ञानेश्वरी, अमृतानुभव ,हरिपाठ
अभंगा तसे ज्ञानेशाचा बोधामृत ||३||
निवृत्तीनाथ,सोपानदेव बंधू
मुक्ताई बहीण छान मिळे
वडिलांनी घेतला संन्यास
सांगण्यासाची मुले सळे ||४||
तत्त्वज्ञान, काव्य ,अनुभव
त्रिवेणी संगम श्रेष्ठ ज्ञानदेवी
माझ्या हृदयी आहे स्थान
एक तरी ओवी अनुभवावी ||५||