संत गाडगे महाराज (पोवाडा)
संत गाडगे महाराज (पोवाडा)
थोर संतास करून वंदन । महाराष्ट्र भूषण। आयुष्य खेड्या खेड्याला दिले झोकून। विडा उचलला महापुरुषान।जी जी जी ।।
शेंडगाव अमरावती जिल्ह्याला। आनंद झाला धरतीमातेला । महाराष्ट्राला हिरा मिळाला। पुण्य लाभले भारत मातेला।जी जी जी ।।
लोभ नव्हता कोण्या प्रसिद्धिचा । ध्यास होता लोकसेवेचा।
रंजल्या गांजल्याची सेवा करण्याचा। मानवाची सेवा करण्याचा ।जी जी जी।।
कीर्तनातून समाज प्रबोधन। अंधश्रद्धेवर प्रहार करून। अडाणी जनतेला देऊन लोकशिक्षण। समाजाला दिले विचारधन।जी जी जी ।।
स्वच्छता, स्वावलंबन आणि शिक्षण। सत्यावर विश्वास ठेऊन।कर्म कांडाला बळी देऊन।प्रबोधन ग्रामीण भागातून।जी जी जी ।।
श्रेय त्यांच्या पवित्र कार्याला। हागणदारी गावे मुक्त करण्याला। हातात झाडू घेऊन महाराष्ट्र स्वच्छ करण्याला।
आदर्श त्यांनी हो दिला। जी जी जी ।।
स्वच्छतेचा मंत्र महान।जतन व्हावे त्यांचे स्मरण। त्यांनी वाहिले मानवास जीवन। आदर्श स्वतः च्या कृतीतून।जी जी जी जी।
बळी देऊ नका प्राण्यास। भूतदया मनी असावी सर्वांस।
त्यांच्या जीवनाचा विचार करण्यास। हिंसा नको हो मानव प्राण्यास।जी जी जी ।।
पुजू नका म्हणे दगडाच्या देवाला। बळी पडू नका कर्मकांड थोतांडाला। शिकवण त्यांची मानवाला।
माणसात देव शोधण्याला। जीजी जी।।
नाव-डेबूजी झिंग्राजी जानारकर
जन्म-23 फेब्रुवारी1876
मृत्यु-20 डिसेंबर 1956
