संस्काराची शिदोरी
संस्काराची शिदोरी
सर्वांगीण संस्काराचे मोल
प्रतिदिन घरोघरी जपावे,
*खाण तशी माती* असते
पिढीस समजून सांगावे..!!१!!
गुण सत्य चांगुलपणाचे
जर अंगी नाही बाळगला,
*खोट्याच्या कपाळी गोटा*
कोण नसेल वाचवायला..!!२!!
शुद्ध आत्मा, निर्मळ मन
नका निंदवु कोणाला,
*चिंती परा येई घरा*
दुखावल्यास दुसऱ्याला..!!३!!
लहानपणीच्या चांगल्या सवयी
मानवास योग्य वळण लावी,
*जी खोड बाळ ति जन्मकळा*
जीवन सुखी संस्कारमय बनवी..!!४!!
वर्तणूक असावी निष्ठावंत
वाईट विचार द्यावे टाकून,
*आचार भ्रष्टी सदा कष्टी*
आयुष्य जाईल दुःखी राहून..!!५!!
चांगल्या कर्माचे फळ गोड
जपावे सदा संस्काराची शिदोरी,
*घटका पाणी पिते, घड्याळ टोले खाते*
जर वागल्यास जीवनात कुसंस्कारी..!!६!!
