STORYMIRROR

vaishali vartak

Inspirational

4  

vaishali vartak

Inspirational

संस्कार

संस्कार

1 min
402

असे मातीचाच गोळा

जीव जणू उदरात

माता करीते चिंतन

सुविचार ते मनात


गर्भातून देई तया

सदा सात्त्विक विचार

 जन्म देऊनी बाळास

बने माता शिल्पकार 


 संस्काराच्या बळावर

 होई यशस्वी उज्वल     

 मिळे किर्ती आयुष्यात  

 मत खरेची प्रांजल


 देई कुंभार मातीला

 प्रेमभावे तो आकार

होत असे मनाजोगा

घट करी तो साकार

 

 करी शाळेत शिक्षक 

 संस्काराची उजळणी

जीवनात उपयोगी 

राहे सदा आठवणी


असे असते जीवनी

संस्काराचे ते महत्त्व 

होतो सदाची यशस्वी

मिळवितो तो श्रेष्ठत्व


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational