STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

संसार आहे सुखात...

संसार आहे सुखात...

1 min
126

प्रेमाला होकार

लग्नाला नकार,

कारण मी होतो

सुशिक्षित बेकार.


सोडला तिचा नाद

नको उगी बरबाद,

जिद्द, मेहनतीने

जीवनात आनंद.


प्रेम असतं खोटं

आयुष्याची लागे वाट,

बांधली ही खुणगाठ

शिकून व्हावं मोठं.


शिक्षणाची धरली कास

जिद्दीने करून अभ्यास,

साकारले मी स्वप्न

मिळवून मोठे यश.


झाला आनंद फार

अभिनंदन नी सत्कार,

जिद्द,मेहनतीने

गाठा यशोशिखरावर.


झाली तिलाही खुशी,

भेटली माझ्याशी,

लाजली,हसली,बोलली

गोड गोड जराशी.


झाली माझी ती राणी

मावेना आनंद गगनात,

माझे स्वप्न आहेत मोठे

संसार आहे सुखात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract