संपदा
संपदा
रुपसंपदा यौवनी बहरे
यौवनातले विभ्रम सारे
कांचनसंध्या येताच विरे
रुपसंपदा जरेमधे नुरे
धनसंपदा कष्ट करुनी
जमवितसे लक्ष देऊनी
यमदूतांनी नेता इथूनी
धनसंपदा मागे टाकूनी
चिरसंपदा ज्ञानबलाची
चौर्य तयाचे कधी न होई
वर्धित होई दान देऊनी
समाजामधी मान वाढवी
ज्ञानसंपदा सुसंस्कृतांची
विद्वानांमधे मतांतरांची
विद्याप्रांगणी ओढ ज्ञानाची
नवनवीन ध्येयप्राप्तीची
