संप
संप
न्याय मागण्या हक्कासाठी, झगडत आहे तुम्ही.
जागी जनता झोपले सरकार, रगडत आहे आम्ही.
सारे आनंदाचे क्षण, सारा गोडाधोडाचा हा सन.
लागे घराचीया ओढ, असे सुन्न झाले मन.
अजाण कल्पना कोन्हा नव्हती, होते गाफील सगळे.
नियतीचा डाव सारा, कोन नाही इथे मोकळे.
न्याय मिळावा सर्वांना, परी हातात माझ्या नाही.
ज्याच्या हाती सत्ता, ते तरी बोलतील का काही.
प्रत्येकाला हक्क आहे, मत आपले मांडण्याचा.
मागण्या ज्या काही असतील, सगळ्या त्या बोलण्याचा.
त्रास थोडा झाला, तरी कामाला येईल कंप.
सामान्यांची थोडी सोय करा, मग करा संप.
