STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

3  

Sanjay Raghunath Sonawane

Inspirational

सण गुडीपाडवा

सण गुडीपाडवा

1 min
1.3K


नववर्षाचा,नवचैतन्याचा

सण गुडीपाडवा आला

ढोल, तास्यांचा आवाज घुमला

दिव्य सणाच्या स्वागताला


मना मनाला आनंद देण्याला

नवसंदेश प्रगती करण्याला

मानवी भावना मनोमिलनाला

सण नववर्ष्याचा आला


करू या स्वागत दरवर्षाला

आदर्श परंपरा अशीच जपण्याला

संदेश देऊ जनहीत साधण्याला

संस्कृती भारताची नित्य संवर्धनाला


घराघरात सण मानाचा शोभला

राष्ट्रमूल्ये रक्तात दिसण्याला

बळ देऊ या एकात्मतेला

भारत एकसंघ राखण्याला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational