STORYMIRROR

Bharati Sawant

Inspirational

3  

Bharati Sawant

Inspirational

सन्मान नारींचा

सन्मान नारींचा

1 min
259

थोर जिजाबाई आदर्श माता

केलें संस्कार बालशिवबांवर

घेत वसा स्वराज्यस्थापनेचा

घडविले पुत्रालाच रणधुरंधर

जपुन तिने पोरक्या संभाजीला

ओळखला स्वकीयांचाच कावा

पित्यापाठी दिले शस्त्रप्रशिक्षण

घडविला महाराष्ट्रासाठी छावा

दुधवाली रायगडीची हिरकणी

ममतेपोटी बनली रणरागिणी

किर्रर्र रात्रीचा टकमक कडा

उतरली धैर्याने ती बावनखणी

हसूनी खेळूनी नारी कुटुंबात

दुःखे गिळतेच आतल्या आत

दुसऱ्यांसाठी झिजे चंदनापरी

महत्वाकांक्षाही तिच्या उरांत

क्षणांची पत्नी जीवनभर माता

आजी बहीण नात्याने वहिनी

नानारूपात फिरते समाजांत

हर स्त्रीची निराळीच कहाणी

करूया सलाम नारीशक्तीला

उचलू वाटा समाजप्रबोधनाचा

मुलगा मुलगी नसावा भेदभाव

पिटू डंका लेकीच्या सन्मानाचा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational