STORYMIRROR

Eshawar Mate

Tragedy

2  

Eshawar Mate

Tragedy

संकटांना बोलवारे

संकटांना बोलवारे

1 min
14.1K


ध्येय माझेही यशाचे,

संकटांच्या पार आहे।

संकटांना बोलवारे, 

मीच त्यांचा यार आहे।।.

रक्त माझे इंकलाबी 

शिवबांचा वार आहे।

हात पापी कंटकाचे,

 छाटणारी धार आहे।।

राबणारा हात माझा 

जीवनाचा सार आहे।।

 ध्येयवादी माणसांना, 

जोडणारी तार आहे।।

प्रेरणेची साथ मोठी

आज मी यल्गार आहे।

उंच आकाशी भयाला, 

मारणारी घार आहे।।

ऐतखाऊ माणसांचा 

जगालाही भार आहे।

राबणारे थोर पण

आज त्यांची हार आहे।।

आजही मोकाट साले,

 देशव्यापी देशद्रोही।

 राजनीती पावलेले,  

घोर पापी देशद्रोही ।।

ऐतखाऊ फार झाले,

नासके गद्दार झाले

सत्य दडवी पक्षपाती, 

द्वेषवादी देशद्रोही ।।

जो कुणी आवाज होतो, 

न्यायवादी साद होतो

तो ठरवल्या जात आहे,

सत-अलापी देशद्रोही।।

 बेगमी निर्धार केले, 

सत्यवादी ठार केले

पुज्यनिय का होत आहे, 

भेद-छापी देशद्रोही।।...

कालचा तो थोरबाबा, 

आजचा तो चोर बाबा

भक्तभोगी ढोर बाबा, 

झाक झापी देशद्रोही ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy