संदेश
संदेश
किलबील पाखरांची
तारावर नित्यं चाले
रव त्यातूनी येई
उकले आयुष्य सारे ..
कुणी भर्रकन उडे तरूवरी
झुले हिरवी डहाळी
कुणी चोचीत केर धरुनी
गाती स्वच्छतेची भूपाळी..
निळू अंग चिंब करूनी
देई नादात नारे
फडफडता पंख ओले
गवसे कुणाला इशारे..
कधी क्षणात उंच भरारी
भेदती भास्कराला
इवल्या तनूची ही विमाने
मित्र मानती अंबराला..
होई खुशाल जीवन
देता धीर मागच्यांना
संकटे पुढची पळती
मिळती संदेश माणसांना..
नसे राग द्वेष कुणाचा
अवघा चिवचिवाट सारा
पाहुणी निकोप खगांना
झाला आनंदीत वारा !!
