संडास बांधा दारी
संडास बांधा दारी
कारभारी ... आता संडास बांधा दारी रहायला मोठी माडी
फिरायला बुलेट गाडी
नका घेऊ मजला साडीचोळी
पण .. कारभारी, संडास बांधा दारी..
सूर्य उगताच गाव होते सुरु
दुपार होवूनही काम ना उरके
पहाटे उठून कुठवर जाऊ
मी आता उघड्यावरी....
म्हणून म्हणते..कारभारी संडास बांधा दारी..
गावात मोठा मान
तुमच्या बापाची पण शान
नको मजला सोनं नानं
पण संडास बांधा छान
मग बंदच होईल एकदाची हागणदारी
म्हणून म्हणते, कारभारी संडास बांधा दारी..
चला करा आता तयारी
अनुदान आलं बँक खाती
शोषखड्डा खोदून घेऊ
संडास बांधू भारी...
अग कारभारीन.. चल संडास बांधू दारी..
