स्मरण
स्मरण
**********************
तुझे स्मरण
व्हावे *नित्याचे,*
भास मनाला
त्या *संस्कारांचे.*
कधी न तुटे
हे व्रत *तुझे,*
स्वप्नच झाले
तुझे नी *माझे.*
भाव भक्तीचा
मनात *भोळा,*
असाच राहो
संस्कार *मेळा.*
तुला पाहता
प्रेम *अंतरी,*
रोज पुजावे
तुला *देव्हारी.*
तू मांगल्याचे
प्रतिक *आहे,*
चैतन्य सदा
अंतरी *वाहे.*
तुला पूजितो
मी *मनोभावे,*
भक्तीत तुझ्या
रंगून *जावे.*
----------------------------------------------
