स्मरावे बलिदान
स्मरावे बलिदान
किती गुंतून गेलोय आपण सगळेच
वर्चूअल नि वैयक्तिक अशा जीवनात
कि भानच नाहि राहत ते बाेर्डर वर अहोराञ
लढतात आपल्या रक्षणात
त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची बातमी पाहून
रक्त अगदी उसळून येते
पण एक मुलगा गमावल्या वरही ती माऊली दुसरा वीर पुञ पाठवण्यास पुढे सरसावते
डोळे पाणवलेत तरी प्रत्येक अश्रूत
अभिनान हा ओथंबलेला
छाती गर्वाने फुलली तरी आधार निघून गेलेल्या
पित्याचा खांदा काहिसा झुकलेला
नकळत आपल्यावर आलेल्या जबाबदारीला
आपणही ओळखायला हवे
जवानांच्या अनमोल बलिदानाने मिळालेल्या
आयुष्याला सत्कारणी लावायला हवे
