सम्राट अशोक
सम्राट अशोक
मोर्या कुळातला राजा
चक्रवती सम्राट राजा
इतिहासातले महान
असे एकमेव महाराजा.
जिंकले कलिंगा युद्ध
रक्ताच्या थारोळ्यात
मृत्युमुखी,जखमी बघुनी
तिळतिळ तुटले हृदयात.
दिली फेकुन तलवार
स्विकारला बौद्ध धर्म
राज्य जोपासले छान
करुनी माणसुकी कर्म.
प्रजेसाठी सदैव सज्ज
ऐकण्या गाऱ्हाणे तत्पर
न्याय निवाडा प्रजे हिता
बांधल्या धर्मशाळा सत्वर.
शिलालेख धर्म प्रचारा
मौर्या कलाकृती पहा
पाहुद्या आपल्या मुलांना
सम्राट अशोक राजा अहा.
तिरंग्यावर आऱ्याचे चक्र
शिकवण काम वेग वृत्ती
शान ठरलीय ध्वजावर
बाळगावी वृत्ती ठेऊनी भक्ती.
