समजून घे जरा
समजून घे जरा
जीवनात भेदभाव संपवून घे जरा
राग द्वेष विस्तवात पेटवून घे जरा
दु:ख भोगतो कशास कालचेच लाडक्या
आनंदात वर्तमान तू जगून घे जरा
वेदनेस मायबाप ना कुठेच राजसा
काळजात आसवांस साठवून घे जरा
स्वाभिमान डामडौल जीवनात होतसे
सूर्य होत तू तमास ओळखून घे जरा
दोन घास भाकरीस हिंडतात माणसे
जेवणास देव हेच बोलवून घे जरा
