STORYMIRROR

siddheshwar patankar

Comedy Others

3  

siddheshwar patankar

Comedy Others

सलमान करतो ती श्टाईल

सलमान करतो ती श्टाईल

1 min
211

सलमान करतो ती श्टाईल

त्याने चड्डी घातली काय

नि तो उघडा फिरला काय


कुणीच काय बी बोलायचं नाय

सलमान हाय भाय त्यो सलमान हाय

बोलायचं काय बी काम नाय


जिथं तिथं असतो त्याचाच बोलबाला

इथं कोण इचारतंय आम्हाला

साधं कुत्रं ओळखत नाय साला


मी पण एकदा अंगावरती

नाव कोरलं सल्लू

शर्ट काढूनि फेकून दिल्ल्ल


नि बाहेर पडलो हल्लू

वाटलं कुणीतरी आयटम सल्ली

बॉललं हन्नी हन्नी


बोलताक्षणी फिरवू तिल्ला

गल्लीबोळी वन्नी

फिरून चटकून गाव हुंगलं


नाय भेटली कुणी मन्नी ,

दादा , मला नाय भेटली मन्नी

चकरा मारून चक्कर आली


बसलो झाडाला टेकून

तेरे नामची गाणी म्हटली

उघडी छाती दाखवून


बाप माझा शोधात हाय

हे सांगत आला टिल्लू


धरणीकंप त्यो झाल्यावानी

जमीन लागली डुल्लु


अंगावरचं सल्लू जाउनी

लिहून घेतलं म्या " पिल्लू "

दादा, लिहून घेतलं म्या " पिल्लू "


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy