STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Romance Tragedy

4  

Neha Ranalkar(Nawate)

Romance Tragedy

सख्या तुझ्या विरहात

सख्या तुझ्या विरहात

1 min
218

जात नाही दिवस 

नाही रे जात रात!

सख्या तुझ्या विरहात!!१


क्षण भासतो युगासम

वेळ जाता नाही जात!

सख्या तुझ्या विरहात!!२


पौर्णिमेची चांद रात्र

डोळ्यांत मात्र बरसात!

सख्या तुझ्या विरहात!!३


कोसळतात जलधारा

होते लाहीलाही शरिरात ! 

सख्या तुझ्या विरहात!!४


तुझ्या शिवाय मला

स्वारस्य नाही जगण्यात!

सख्या तुझ्या विरहात!!५


तुझ्या सोबत असणे

होईल धुंद चांदरात!

सख्या तुझ्या विरहात!!६


आठवणी तुझ्याच सदैव

करती विचारांवर मात!

सख्या तुझ्या विरहात!!७


माझ्या इतकीच तु ही

देणार ना मला साथ!

सख्या तुझ्या विरहात!!८


ख-या प्रेमात प्रियकराचा प्रेयसीला विरह सहन होत नाही. तिच्या प्रियकरा बद्दलच्या भावना या कवितेत थोडक्यात व्यक्त केल्या आहेत!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance