# सखा
# सखा
अंधारल्या काळोखातील
तू एक काजवा
विरहाच्या प्रवासातील
एक असे विसावा
सुकणाऱ्या मनाला
देई मंद शिडकावा
तूच रे सोबती माझा
तूच माझा सखा
प्रश्न उभे नवे
उगवता दिवस नवा
उकल होण्या त्यांची
सोबतीला तू हवा
निराशेतल्या मनाला साथ
द्यावया तू हवा
तूच माझा सोबती
तूच माझा सखा.
प्रा.सौ. नलिनी लावरे
