STORYMIRROR

nits Shelani

Romance

3  

nits Shelani

Romance

सखा...

सखा...

1 min
270

सख्या रे तू असा कसा,

एकदम जगावेगळा,

प्रेमापेक्षा खूप काळजी असते तुला

कसं, ओळखतो माझ्या मनाला?

कधीही गिफ्ट्स नाही दिले मला,

पण इन्शुरन्स घेऊन करतो सुरक्षा.

मैत्रिण मानणारा स्वतः च्या बायकोला,

सगळं गुपित तिला सांगणारा तु एकमेव नवरा.

नाही जमत शब्दाने प्रेम व्यक्त करणे तुला,

पण डोळ्यात पाहते मी त्या प्रेमाला.

मला काही दुखले की तुला होतात वेदना,

किती रे जपतो तु माझ्या जीवाला.

खरंच तो किती आहे वेगळा

जणू माझ्यासाठी देवाने पाठवले तुला,

सख्या रे तू जसा आहे तसाच हवा मला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance