STORYMIRROR

Amrapali Ghadge

Inspirational

3  

Amrapali Ghadge

Inspirational

सखा पुस्तक

सखा पुस्तक

1 min
121

पुस्तक असे सखा

मार्गदर्शक जीवनाचा

ज्ञानामृताने होई तृप्त

लागेल ध्यास ज्याला याचा


 पानोपानी शब्द खजिना

 पुस्तक ज्ञानाचे विपुल भांडार

 कधी दुःखावर घाली फुंकर

 देई भरकटलेल्यासी आधार


 बनता दास पुस्तकांचा

 मिळे शब्द संपत्ती तयास

 तारेल आयुष्य तयाचे

 समर्पण करील जो पुस्तकास


 प्रबोधन,मनोरंजन करत

 मुके शब्द ठाव मनाचा घेती

 समरस होता शब्दांमध्ये

 कल्पनेच्या जगतात नेती


 जडता व्यासंग पुस्तकाचा

 विकासाचा मार्ग सापडे

 आत्मिक समाधान लाभते

 ज्ञानकुबेरावर ज्याचा जीव जडे 


होऊन वाटाड्या वाचकांचा

 अज्ञानातून ज्ञानाकडे नेई

 मनोभावे वाचणाऱ्याचा 

 खरा सखा सोबती होई



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational