STORYMIRROR

Amrapali Ghadge

Tragedy

3  

Amrapali Ghadge

Tragedy

रमाई

रमाई

1 min
181

माझ्या भोळ्या रमाईची 

ऐका सांगते कहाणी

नऊ कोटी माऊलीची 

होती साधीच राहणी


गोड गोजिरी देखणी

लेक भिकू रखमाची

अर्धांगिनी ती भिमाची

सून आंबेडकरांची


होती गरिबीची जाण

नाही जराही खचली

साथ पतीची देताना 

दिव्यापरी ती जळली


दुःख डोंगर झेलूनी

झाली हळव्या मनाची 

कोटी कुळं उद्धारली

साथ देऊन बाबाची


त्यागमुर्ती रमाई ती

होती प्रेरणा भीमाची

वात्सल्याचीमुर्ती रामू

झाली घास भुकेल्यांची


फक्त समर्पण भाव 

होता रमाईच्या मनी

नाही हव्यास कशाचा

सर्वस्वच तिचे धनी


तीच्या उपवसापाई

खातो सोन्याचा हा घास

कृपा रमाईची झाली

आली दारी सुख रास


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy