STORYMIRROR

Amrapali Ghadge

Action

3  

Amrapali Ghadge

Action

विद्रोही

विद्रोही

1 min
246

समतेची ज्योत अखंडीत राहण्यासाठी,

आपल्याच समाजात आपलेच स्थान,

आपले हक्क टिकून ठेवण्यासाठी,

विषमतेचा किडा रगडायला, 

आपल्यात आपलाच मेळ असावा लागतो....

एकात्मतेचा भाव मनी रूजवावा लागतो...

पण एखाद्याला विद्रोह का करायचंय तेच माहिती नसतं

 फक्त कवितेत अपशब्द लिहून विद्रोह होत नसतो

याने केला त्याने केला म्हणून मी पण करणार

रक्तातच असायला पाहिजे त्याशिवाय कसा विद्रोही होणार

सोपं नसतं विद्रोही होणं त्यासाठी प्रवाहाच्या उलट दिशेने पोहावं लागत...

दोन शिव्या हासडल्या म्हणजे विद्रोह नसतो

किंवा आई बहिणींचा उद्धार करण्यात कसला आहे पुरुषार्थ

विद्रोही होणं कोण्या येड्यागबाळ्याचं काम नसतं 

त्यासाठी मनगटात जोर असावा लागतो..

उरात वणवा पेटवावा लागतो अन् रक्त उसळावं लागतं,

बंडखोर वृत्तीनी शब्दांच्या फैरी झाडाव्या लागतात...

आणि तेच शब्द क्रांतीची मशाल होऊन पेटतात

आणि क्रांती घडवते एक नवा इतिहास...

उदयास येतो एक नवा विचार एक नवा बदल

आणि तेंव्हाच होतो त्या विद्रोहाचा विजय...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action