STORYMIRROR

Amrapali Ghadge

Tragedy

3  

Amrapali Ghadge

Tragedy

अंत

अंत

1 min
123

व्हावा आता अंत

ही अंतरमनी आस

जीवनाच्या कसोटीत

देवा कर आता नापास 


जीवघेण्या परीक्षा

कित्येकदा घेशील 

नापासचा शेरा माथी

कित्येकदा मारशील


प्रयत्न केले,केले कष्ट

शिण नाही नि थकवा

यश पदरात टाकताना 

देतोस मला तू चकवा


सांग ना रे असे कसे

भाग्य माझे नाराज

फुलापरी आयुष्यात

कट्यांचा आहे साज


झगडले नियतीशी

कोसलेही कित्येकदा

दुःख फिदा माझ्यावर

तर सुख रुसते सदा


दुरूनच सुख माझे

मला हसतसे नेहमी

झोळी तुझी फाटकीच 

म्हणे,सांग कसा येऊ मी


बहाणा जगण्याचा हा 

का म्हणून करावायचा

अश्रू आलेला डोळ्यात

नेहमीच का लपवायचा


घेऊन माझी माघार

मी जीवनापुढे झुकते 

कर मोकळा श्वास

एवढी विनंती करते


खरा खोटा कोण

मुखवटे इथे अनेक

बेडगी दुनियात या 

जों तो म्हणे मीच नेक 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy