STORYMIRROR

Amrapali Ghadge

Others

3  

Amrapali Ghadge

Others

पाळी स्त्रित्वाची

पाळी स्त्रित्वाची

1 min
152

 


निसर्गनिर्मित स्त्री रचना

अद्भुत अशी किमयागारी

पाळी मुळेच जीवनिर्मिती

उपकार तिचे आपल्यावरी


पाळी मुळे लाभे स्त्रीत्व 

पाळीमुळे पदरी ममत्व

पाळी मूळे वाढ वंशवेल

पाळी मुळे जीवनी पितृत्व 


विटाळ म्हणून दूर लोटता

पाळीला का नावं ठेवता 

निसर्गचक्राच्या नियमाला 

लाजिरवाणे का समजता


आई मुलगी पत्नी-स्त्री 

प्रत्येकीला लाभले दान

समजून घ्या तिची वेदना 

पाळीला नका समजू घाण


शुभकार्य असो वा दुःखदारी 

नका वाळीत टाकू पाळीला 

समजून घ्यावे माणूस म्हणून 

अनिष्ट रूढी टांगा वेशीला



Rate this content
Log in