सखा माझा तू खास
सखा माझा तू खास
वाटे आहेस तू इथे सख्या
माझ्या घराच्या आसपास
तरी मजशी हा विरह करतो
रातदिन बेजार तासनतास...
हाल माझे पुसावे तू मला
नित्यच दर्शन तुझे घडावे
दश दिशांही दिसती नाराज
दिलाची उदासी तू माळावे...
सख्या तुझ्याविणा नाही कोणी
मी तुझ्या दिलाची रे राणी
आपल्या जीवास का छळतोस
मनाचे करतो पाणी-पाणी...
नाव तुझं कोरले हृदयात
झाला जरी मला गोंदता त्रास
तूच होता तूच आहेस दिलबर
राहशील सदा सखा माझा तू खास...
माझ्यावरचे आटू नये प्रेम
कितीही कशाही कारणास्तव
राहो तुझी मजवर अंबराची छाया
बसव ताळमेळ माझ्या प्रेमास्तव...

