सकाळ
सकाळ
सकाळ"
नेत्रांजन या डोळ्यात घालूनी
नेम धारूनी नाlस्त्रीमुक्तीची ही सकाळ झाली
पायातील या बेड्या तोडूनी
आजची ज्ञानज्योती सावित्री सबल झाली//
अशी फिरू नकोस ग माघारी
दाखव सुर्या सारखी तेजस्विता
उगवतो रवी नित्य नेमाने सकाळी
तयाला कोणाची नसे भयचिंता//
तळपत्या सकाळच्या किरणांसारखी
तापलेली उन घे अपुल्या अंगावरी
आपल्या जीवन कलेत भरावी
देशाची धूरा उचलण्या हो वैखरी //
आकाशात उंच उडण्याकरीता
कधी पंख ही होतात जख्मी दु:खी
स्त्रीजातीचा उद्धार करण्यासाठी
हो सज्ज तू सावित्रीबाई सारखी//