सकाळ एक नवीन सुरूवात....
सकाळ एक नवीन सुरूवात....
सकाळ एक नवीन सुरूवात
वर्तमानात जगण्याचा एक किरण,
नवसकाळ हाेताच माेहरते तन, मन....
सकाळ एक नवीन सुरूवात
असताे प्रेरणेचा अखंड झरा,
सकाळच्या साथीने शाश्वत काम करा....
सकाळ एक नवीन सुरूवात
भूतकाळ साेडून भविष्याची आशादायी पहाट,
प्रत्येक सकाळ मनाेहारी त्यामुळे सापडते वाट....
सकाळ एक नवीन सुरूवात
आयुष्याचे असते एक नवीन मार्गक्रमण,
प्रत्येक सकाळ वाढवते आपले भाैतिक धन....
सकाळ एक नवीन सुरूवात
करावी देवाची प्रार्थना मानावे आभार,
दररोजची सकाळ अनुभवण्याचा दिला सुविचार....
