STORYMIRROR

Meena Kilawat

Romance

2  

Meena Kilawat

Romance

श्वासांचे स्पंदन

श्वासांचे स्पंदन

1 min
13.6K


तुझीच ही स्वप्ने रोज या नयनी

घेऊन जगतो तुझ्या आठवणी

तु जाता कधी सोडूनी मजला 

नसे माझा मी न आता कोणी.

ओलेचिंब देह वाळवीत रहावे

कुणी ही त्यावर ऊन फेकावे

ओलेतीया चिंब या देहावरती

पुनह: ही तुझेच नाव लिहावे.

मनी दरवळतो हा वेडा मोगरा

हा ध्यास असा मज कां तुझा

हा भास सदोदित मज हवासा

कां गोड मधुरस सहवास तुझा.

जगतो मी हा विश्वास कसा

जणु हा ध्यास लागतो प्रेमाचा

मन हरवते कधी झुरवते माझे

गहिवरते मन सखे या हृदयाचे.

मन हसते कधी रडते माझे 

कधी शब्दांतुनी उलगडते

कधी पळते कधी उडते प्रीया

फुलांवरी सुगंधापरी दरवळते..

कधी भिजून ते रुजते सख्या

या डोळ्यांतूनी अश्रृ झिरपते 

तू दिसता वाढे श्वासांचे स्पंदन 

अंग हे थरथरते मी माझा नसते........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance