Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yeshoda Patil

Romance

4.0  

Yeshoda Patil

Romance

श्वास

श्वास

1 min
217


काढ ना कर गळयातूनी 

कर मोकळी ती कुंतले

किती आठवांचे केवड़े

श्वासात तुझिया गुंतले


काढ वेडे शृंगार सारा

तव देह ज्याने व्यापिला

झिडकारूनी ही बंधने

घेई श्वास थोडा मोकळा


चांदण्यांची ही रात्र माझी

अन् बांधलेला हा जुड़ा

हा मोगराही वेडावला

बघ टोचतो ना आकडा?


घोर ह्या हिरव्या चुड्याचा

अन ही टोचणारी जोडवी

बांधलेले बाजुबंद का?

 गाईशी तयांची गोडवी


ही पौर्णीमेची रात्र आणि

शुभ्र चांदणे त्यांच्यासवे

 दोन्ही व्याकुळलेली मने

आणि सांगाती काय हवे?


मोकळी दोन्ही मने ग

अन् मोकळी दोन्ही तने

ह्या दो जिवांच्या मिलनानी

प्रसवत्तील मधु चांदणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance