STORYMIRROR

sarika k Aiwale

Romance Inspirational

3  

sarika k Aiwale

Romance Inspirational

श्वास तुझ्या स्वप्नाचा...

श्वास तुझ्या स्वप्नाचा...

1 min
257

आज फिरुनी वारे 

तेच गीत का गाई 

पाश नात्याचे सारे 

मला दोष का देई


नयनी कोरडे वारे 

रात काजवे या मनी

उरी भरूनी हे वाहे 

भाव कोरडे साहुनी


श्वासातही आस जागे 

भासात स्वप्न आहे 

असुनी नसण तुझं 

मला छळू का पाहे 


मरणात माझ्या या 

दोष कोणास ठेऊ

उरल्या श्वासाच या 

देण कोणास देऊ


भास तुझ्या स्वप्नचा 

ह्रदयी या उरु पाहे 

 श्वास या जगण्याचा 

विरह तुझा हा साहे 


वेंधळी असे ती सांज 

पहाट बावरी झाली 

विखुरलया भावनेस 

मनी खिळवुनी गेली 


रोजचीच कथा जुनी

बहाणा नवा का शोधी 

भास तुझ्या स्वप्नाचा 

मनास जीवन देई


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance