STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Inspirational Others

3  

Nurjahan Shaikh

Inspirational Others

शूरवीर संभाजी राजे

शूरवीर संभाजी राजे

1 min
189

ठेवूनी आदर्श समोर 

मांडले अलौकिक धोरण 

वारसा हा शिवरायाचा 

संभाजीस देई कारण 


जोपासुनी स्वराज्य मुले 

वाढवी मराठा वारसा 

दिसे प्रशासकीय कौशल्ये 

छत्र छायेचा हा दिलासा 


नेतृत्व सांभाळी संभाजी 

झुंज देउनी एक हाती 

देई दाखले झुंजारपणाची 

मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती 


टाहो फोडे शिलालेख 

गौरव वीर संभाजीचे 

करूनी उद्धार प्रजेचा 

आज्ञा देईन करमाफीचे 


ठसा दिसे महाराजांचा 

बनुनी महत्वकांक्षी धोरणी

मिळे बाळकडू बालपणी

शूर धुरंदर राजकारणी 


आजही देई मानेचा मुजरा 

धन्य ती राजाची जनता 

ज्याला देई संस्कार शिवबा 

घडे शूर संभाजी जनहिता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational