शुभेच्छांची काव्यसुमने
शुभेच्छांची काव्यसुमने
नम्र वाणीला लाभे
साथ सुहास्याची
सुस्वभावाचे लेणे
जोड विनयाची (१)
मैत्रभावे जोडले
अनेक बंधू मित्र
नवोदित रसिक
आपण जगन्मित्र (२)
काव्य सुमनमाला
रसिकांना अर्पिली
सुगंध दरवळे
रसिकमनी रुजली (३)
रंगभूमी नटश्रेष्ठ
कलाक्षेत्र गाजवले
साहित्य क्षेत्रातही
पुरस्कार मिळवले (४)
ऊन सावली जीवनी
सुख दुःखांचा खेळ
समतोल आचरणे
भावनांचा योग्य मेळ (५)
गगन भरारी घेऊनी
बहुक्षेत्रे गाजवली
अभामसाप अध्यक्षपदी
यश कीर्ती मिळवली (६)
इतिहासकार व्याख्याते
संगीत दिग्दर्शक
बहुआयामी व्यक्तिमत्व
आपण लाखांत एक (७)
लाभो दीर्घआयुरारोग्य
मनी सदा समाधान
ईशकृपा लाभो अखंड
चिंतामणीचे वरदान (८)
जीवनपथी असाच बरसो
श्रावण प्रेमाचा
सुखस्मृतींचा आठव बहरो
गगन भरारीचा (९)
