श्रमदान श्रेष्ठ दान -कविता
श्रमदान श्रेष्ठ दान -कविता
पाणी फाउंडशनने कमाल केली
दुष्काळावर त्यांनी मात केली
प्राण जीवांचे त्यांनी वाचविले
भारतमातेला महान पुत्र लाभले
निस्वार्थ सेवा अखंड त्यांची
जिद्द, चिकाटी त्यांच्या मनाची
शिकवण त्यांची श्रमदानाची
उत्तुंग शिखरे अखंड यशाची
सेवा करतात मानवी जीवाची
पाणी फाउंडेशनने चेतना जागविली
सर्वांना कष्टाची प्रेरणा मिळाली
सहकार्याची भावना रुजविली
लहान थोरांची जोड मिळाली
एकत्र आले एकजुटीने
पाण्याच्या शोध कार्याने
सफल झाले प्रयत्न गावकऱ्यांचे
तलाव जलमय झाले गावांचे
हिरवीगार खेडी बनली
योजना खरोखर साकार झाली
सुख समृद्ध खेडी नांदली
श्रमदानाने किमया केली
दोन हातांना काम मिळाले
सुखी संसार मानवाचे केले
दुष्काळात आधार झाले
दुःख सारे त्यांचे संपले
श्रमदानाने पाणी जिरले
स्वप्न सत्यात त्यांनी आणले
मुक्या प्राण्यांचे जीव वाचले
पुण्य त्यांचे कुटुंबास लाभले
बंधुभाव प्रेम त्यातून शिकलो
अश्रु गरीबांचे पुसण्यास शिकलो
दुःख गरीबांचे संपविण्यास निघालो
नवा आनंद देण्याला पाणी फाउंडेशन निघालो
