STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

श्री महालक्ष्मी प्रसन्न..!

श्री महालक्ष्मी प्रसन्न..!

1 min
28.8K


!!..श्री महालक्ष्मी प्रसन्न..!!


आई तुझ्या दारी आलो

मी लेकरू तुझे ग

उघड नयन लवकरी

सांडूनी सत्वर निद्रा ग



सूर्य आला क्षितिजावर

पहाट झाली बघ

तुला पाहण्या

सुमंगल प्रभात समयी ग


उठ मुखमार्जन करुनी

आशीर्वाद दे सकलांना ग

दर्शन देऊनी सत्वर

कृतार्थ करी तुझ्या लेकरांना ग


पूजा आर्चा झाली मनोहर

रूप शोभे प्रसन्न सोज्वळ

कृपा प्रसाद लाभता तुझा

धन्य होती बघ भक्त सकळ


आई माझी मी लेकरू तुझे

असेच नाते सदैव उरी राहू दे

प्रभात समयी चिरंतन

दर्शन मंगल मज सदा लाभू दे..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational