STORYMIRROR

Vishweshwar Kabade

Abstract

3  

Vishweshwar Kabade

Abstract

श्री गणराज

श्री गणराज

1 min
223

आला आला, माझा गणराज आला...

झाला झाला, मला खूप आनंद झाला...||धृृ||


सुंदर सजवली तुझी मूर्ती

 तुच देतोस आम्हा स्फूर्ती

तुझ्याजवळ ६४ कला

देे एखादी मला

तुझ्याजवळ उत्कृष्ट स्मरण शक्ती

 म्हणून तर करतो मी तुझी भक्ती

आला आला, माझा गणराज आला...

झाला झाला, मला खूप आनंद झाला...||१||


तुझ्याजवळ क्षमाशील वृत्ती

आम्हासही लाभू दे अशी कृती

तुझ्याजवळ वेगळे कौशल्य

 दूर कर आमचे शल्य

अजब तुझा पराक्रम

 सांगूूनी जातो घटनाक्रम

आला आला, माझा गणराज आला...

झाला झाला, मला खूप आनंद झाला...||२||


तुझी गोड शिकवण

आनंदी ठेवते आमचे मन

लहान थोरांकडे तुझ्या स्थापनेसाठी उत्सुकता

तुझ्या मुखावर नेहमी परम भावुकता

विधिवत केले तुझे पूजन

करतो मी दोहो कराने नमन

आला आला, माझा गणराज आला...

झाला झाला, मला खूप आनंद झाला...||३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract