STORYMIRROR

Poonam Jadhav

Classics Others

3  

Poonam Jadhav

Classics Others

श्री गणेश

श्री गणेश

1 min
201

मोहक तुझे रूप पाहुनी ,

लोभ मला चढला,

हे गणराया तुझ्या रुपाचा,

मोह मला जडला....

मोह मला जडला....


सुंदर ते गजमुख,

मखमली मुकुट शोभेला,

आष्टीगंध कपाळा,

हे गणराया तुझ्या रुपाचा,

मोह मला जडला....

मोह मला जडला....


हराळी-आघाडा अन् केवडा,

जास्वंद सोबतीला,

मोदक हाती प्रसादाला,

हे गणराया तुझ्या रुपाचा,

मोह मला जडला....

मोह मला जडला....


रेखीव-कोरीव रुप तुझे,

हाती शेला , गळ्यात मोत्यांच्या माळा,

तुझ्या ऐटीची भर सौंदर्याला,

हे गणराया तुझ्या रुपाचा,

मोह मला जडला....

मोह मला जडला....


अवघे ब्रम्हांड उभे तुझ्या स्वागताला,

तरी वाहण्याचे तुला भाग्य मुशकाला,

हे गणराया तुझ्या रुपाचा,

मोह मला जडला....

मोह मला जडला....


किती द्याव्या उपमा पार्वतीसुता तुला,

कधी म्हणावे गणेशा, वक्रतुंडा, गजानना,

कधी गणपती बाप्पा मोरया!!!

हे गणराया तुझ्या रुपाचा,

मोह मला जडला....

मोह मला जडला....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics