श्रद्धा
श्रद्धा
स्वप्नपूर्तीसाठी धडपड,करा समृद्ध भावप्रवृत्ती,
ही देते प्रेरणा व बळ,हीच सामर्थ्यशाली श्रध्देची वृत्ती
श्रद्धा असते पुराव्याशिवाय विश्वास,जी गोष्ट अस्तिवात येईल,
श्रद्धा देते लढण्याची इच्छाशक्ती, पुढे जाण्याचं धैर्य श्रद्धा देईल
धाडस आणि साहस करायला, प्रेरणा विचारातून मिळते,
नाविन्याचा शोध घेण्यास, स्फूर्ती श्रध्देतून जन्मते
श्रद्धा केवळ प्रवृत्ती नव्हे, तर ती असते प्रत्यक्ष कृती,
तुमच्या कृतीवर किती श्रद्धा, यावर यशाची होते गणती
