STORYMIRROR

Deepali Mathane

Fantasy

3  

Deepali Mathane

Fantasy

श्रावणसरी

श्रावणसरी

1 min
387

श्रावणसरी बरसून

सुखावल्या अंगणी

अवखळ वाऱ्यासंगे 

घेऊनी सुखाची पर्वणी

  बिलगली मीच मला

  बेधुंद होऊनीया मनी

  श्रावणसरींच्या स्पर्शाने

   सुखावली ही धरणी

चिंबचिंब पानफुले

हिरवळ विसावली रानी

पशूपक्ष्यांची साद 

घूमू लागली काननी

   मन वेडावले माझे

   नयनरम्य नजाऱ्यानी

    साद घातली मजला

   खळखळ वाहत्या झऱ्यानी

मन अवचित कधीतरी

भिजे पावसाच्या सरींनी

उडली ही छत्री माझी

जाहली मोकाट हरिणी   


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy