STORYMIRROR

काव्य चकोर

Inspirational Others

2  

काव्य चकोर

Inspirational Others

श्रावण

श्रावण

1 min
198

आषाढ सरला बेधुंद कोसळला

चिंब आठवणी मज देऊन गेला..

चैतन्य फुलले तेजाळली धरा

पाहण्यास सोहळा श्रावण आला घरा..!!


हिरव्या शालूस फुलांची किनार

धरित्री सजली लेवून नवबहार..

निसर्ग हिरवा पाऊस भुरभुरा..

आकाशी फुलाला सप्तरंगी नजरा..!!


ऊन पावसाचे खेळ सुरू झाले

दवबिंदूंचे झुले फुलावर झुलले..

शिवार फुलले हास्य ओठी पेरले 

बळीराजाचे मन मोत्यांनी भरले..!!


व्रत वैकल्याच्या माहे आले सणवार

लेक नांदते सासरी खुणावते गं माहेर..

खुले स्वर्गाचे द्वार की स्वर्ग पृथ्वीवर

ऐसा मोहक श्रावण मज भावतो फार..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational