STORYMIRROR

Pandit Warade

Inspirational

3  

Pandit Warade

Inspirational

श्रावण

श्रावण

1 min
26.1K


आला श्रावण महिना

हिरवळ चहू कडे

हर्ष मनात दाटतो

मन आनंदानं उडे।।१।।


रोज चालतो श्रावणी

खेळ ऊन पावसाचा

चाले लपंडाव जणू

रात्र आणि दिवसाचा।।२।।


येता सरीवर सरी

धरा न्हाऊन निघाली

जणू गवत फुलांचा

शालू हिरवा नेसली।।३।।


नदी नाले एक होती

वाहू लागते सरिता

ऊर फुटून धावते

कोण्या साजना करिता।।४।।


येता श्रावण महिना

दाटी होते उत्सवांची

मन आनंदे नाचते

वाट पाहे प्रसादाची।।५।।


पशू, पक्षी, झाडे, वेली

निळ्या आभाळाच्या खाली

हात मायेचा फिरता

वसुंधरा तृप्त झाली।।६।।


येती श्रावणाच्या धारा

थेंब जणू अमृताचे

खडकाला फूटे पान्हा

झरे वाहती प्रेमाचे।।७।।


असा श्रावण महिना

हवा हवासा वाटतो

होता आगमन त्याचे

हर्ष मनात दाटतो।।८।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational