श्राप
श्राप
काळाकुट्ट तिमिर
पसरलाय जीवनात
नियतीचा खेळ सारा
आर्तता घुमतेय आवाजात
श्राप हा कि तळतळाट
रस्ते खुंटले चालून आता
धूसर झाल्या आकांक्षा
संपल्या सगळ्या उत्सुकता
पाचवीला पुजलीय
गरिबी कंगालीपणा
काय गुन्हा झाला असा
केला आमच्यासवे भेदभावपणा
सरले होते सारे
पुण्य आशीर्वाद
त्या कारणे नियती
मांडला विषाद
भीक हवी त्यास
दोन घास अन्नाची
थोडी मानवतेची
साद तया मनाची
नशिबी भिकारीपण
परी काबाडकष्ट करू
मेहनत करुनी
पोट खळगी भरू
