शोधू कुठे तुला?
शोधू कुठे तुला?
होती येथेच एकदाबा
बाग फुलांची दिवाणी
तरी शोधून सापडेना
माझी इथे निशाणी
कोपर्यात बाक मोडका
उठून सारा गाव गेला
डोळ्यात आले पाणी
कुठे चुकून ठाव गेला
आठवांची दाटून गर्दी
जीव बारकासा झाला
गतप्राण वचन फुलांवरती
आज पाय थरथरला
नको विलेपित सुखे
काय..! शोभेची सुखाला
दिसेनात भिंती मातीच्या
आला गंध वेगळा त्याला
का..? सांग सय येते
हे माग कसे छळाला?
अर्ध्यात मोडली प्रीत
शोधू कुठे,कसे मी तुला?
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
